दापोली : हिंदूंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या 4 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

banner 468x60

रत्नागिरीतील दापोलीत हिंदूंबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्टनंतर दापोलीत तणाव निर्माण झाला होता.

पोस्ट करणाऱ्या ४ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने दोन गटात तणाव निर्माण झाला होता.

यानंतर पोलिसांनी तातडीने परिस्थिती आटोक्यात आणली.सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. या पोस्टवरुन लोकांचा गैरसमज होऊन कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला होता.

या ठिकाणी तात्काळ दापोली पोलीसांनी प्रतिसाद देऊन या ठिकाणची परिस्थिती आटोक्यात आणली. दापोलीत सध्या शांतता आहे. तसेच आवश्यक त्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे.”

join whatsap group
https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच सोशल मीडियाद्वारे समाजात तेढ निर्माण होणारे संदेश प्रसारीत करु नयेत. जेणेकरुन कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही.

कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सतर्क व दक्ष राहून काही अनुचित प्रकार आढळून आल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा,” असं आवाहन दापोली पोलिसांनी केलं.

Response (1)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *