दी यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंगच्या द्वितीय वर्ष जीएनएम परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे.
परीक्षेत मिसबाह मेहबूब मोगल (७३ टक्के), कीर्ती दत्ताराम लांबोरे (७० टक्के) आणि जान्हवी राजा काजवे (६८ टक्के) या तिघींनी पहिले तीन क्रमांक पटकावले.
या विद्यार्थिनींचे अभिनंदन दी यश फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त, माजी आमदार बाळासाहेब माने, सहव्यवस्थापकीय विश्वस्त सौ. माधवी माने, मिहिर माने, रजिस्ट्रार सौ. शलाका लाड, प्र. प्राचार्य रमेश बंडगर आणि सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले.
दरम्यान, एमएएच बीएसस्सी नर्सिंग सीईटी २०२४, एमएएच एएनएम, जीएनएम सीईटी २०२४ (नवीन) प्रवेशाला आज प्रारंभ झाला आहे. बीएसस्सी नर्सिंगकरिता १२ वी विज्ञान व एएनएम-जीएनएमसाठी १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ही परीक्षा ७ मे दरम्यान होईल.
अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी सर्व माहिती शैक्षणिक कागदपत्रांनुसार अचूक भरावी. सीईटी नोंदणी, परीक्षा व वेळोवेळी येणाऱ्या प्रवेशासंबंधी सूचनांसाठी https://www/mahacet.oerg/ या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा.
सीईटी २०२४ विद्यार्थी नोंदणी, परीक्षा व अधिक माहितीसाठी दी यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग व मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, विमानतळासमोर, एमआयडीसी मिरजोळे, रत्नागिरी येथे संपर्क साधावा.
अधिक माहितीकरिता 8600302454, 8830789570, 8446301404, 9423291863, 8275455708 या क्रमांकावर संपर्क साधता येईल. नर्सिंगमध्ये रुग्णसेवा करण्याची संधी आणि चांगले वेतनही मिळते. विद्यार्थ्यांच्या करिअरसाठीही नर्सिंग हे उत्तम क्षेत्र आहे.
त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सीईटी द्यावी व नर्सिंगसाठी प्रवेश घ्यावा, असे आवाहन दी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे करण्यात आले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















