भाजपाचे रत्नागिरी विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळ माने, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशोक मयेकर यांच्या वाढदिवसानिमित्त विठ्ठल-रखुमाई मित्रमंडळ व कबड्डी असोसिएशन, भाजपा आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद गजानन संघर्ष, दापोलीच्या संघाने पटकावले.
उपविजेतेपद दसपटी, चिपळूण संघाला मिळाले. माजी खासदार नीलेश राणे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. अंतिम सामना फारच रोमहर्षक व चुरशीचा झाला. क्रीडा रसिकांनी भरभरून दाद दिली.
विजेत्या संघाला ५१ हजार रुपये व चषक देऊन गौरवण्यात आले. उपविजेत्यांना २५ हजार रुपये व चषक देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेत तृतीय क्रमांक महापुरुष रत्नागिरी संघाला १५ हजार रुपये व चषक आणि चौथा क्रमांक जय हिंद जय आबा या संघाला १० हजार रुपये व चषक देऊन गौरवण्यात आले.
कार्यक्रमाला बाळ माने, अशोक मयेकर, माजी जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शहराध्यक्ष राजन फाळके, तालुकाध्यक्ष दादा दळी, तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे, राजू मयेकर, दादा ढेकणे आदी उपस्थित होते. या वेळी माजी खासदार राणे यांनी मुंबईच्या धर्तीवर आपण आज तेवढ्या दर्जाचे कबड्डी सामने रत्नागिरीमध्ये भरवले आहात,
याबाबत आयोजकांचे कौतुक केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संकेत मयेकर, विठ्ठल- रखुमाई मंडळाचे कार्यकर्ते पराग हेळेकर, प्रवीण हेळेकर, भाई चव्हाण, साई टिकेकर, राजू तोडणकर, समीर तिवरेकर, मंदार मयेकर, मनोज फणसोपकर, वैभव हेळेकर, अवधूत शेट्ये, सुनील सावंत आदी सर्वांनी खूप मेहनत घेतली.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















