खेड : मुलाकडून आईला घरात शिरण्यास मज्जाव

banner 468x60

खेड : येथील शहरात शिवतर रोड येथे आईला घरात शिरण्यास मज्जाव केल्याने पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपेंद्र भिकाजी घोडे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड शहरातील शिवतर रोड येथे श्रीमती साधना भिकाजी घोडे (वय ७६) यांचा मुलगा उपेंद्र घोडे याने दिवाळी पूर्वी घराच्या मुख्य दरवाजात फ्रिज आणि एलईडी टिव्ही ठेवून रस्ता अडवून ठेवला होता.

या वस्तू उचलून ठेवण्यासाठी समज देऊनही तो ऐकत नव्हता. तर याची विचारणा करण्यासाठी गेल्यावर शिविगाळ करुन दमदाटी करीत असे.

याबाबत येथील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी भादवि कलम ३४१, ५०४ व ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *