तालुक्यातील लाडघर येथे ३८ वर्षीय तरूणाचा फिट येवून विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना ६ जानेवारी रोजी दुपारी २.४५ च्या सुमारास घडली.
समर्थ केळकर (३८, रा. करंजाणी, उघडा मारूती) हा दापोलीमधील इलेक्ट्रीशियन आसिफ देसाई यांच्याकडे पाण्याचे पंप बसवण्याचे काम करत होता.
समर्थ केळकर याला फिट येण्याचा आजार होता. ६ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास तो लाडघर येथील एका विहिरीत पंप बसवण्याचे काम करत असताना त्याला अचानक फिट आली आणि तो विहिरीच्या पाण्यात पडला.
यामध्ये तो बेशुद्ध झाला. त्याला तात्काळ दापोली उपजिल्हा रूग्णालय येथे अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासाअंती त्याला मृत घोषित केले. या घटनेची खबर मृत समर्थचे वडील सुरेश केळकर यांनी दापोली पोलीस स्थानकात दिली आहे.
दापोली पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास दापोली पोलीस स्थानकाचे हेड कॉन्स्टेबल अजित गुजर करीत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















