गुहागर : खाडीत पडून खलाशाचा मृत्यू

banner 468x60

खाडीच्या पाण्यात पडून खलाशाचा मृत्यू झाल्याची घटना पडवे वरचा माेहल्ला (ता. गुहागर) येथे रविवारी (३१ डिसेंबर) दुपारी घडली.

banner 728x90 banner 728x90

संताेष सखाराम रसाळ (३५, रा. मासू, गणेशवाडी, गुहागर) असे त्याचे नाव आहे. संताेष रसाळ हा शरफुल्ला हुसेन मिया माखजनकर यांच्या बाेटीवर काम करत हाेता.

रविवारी दुपारी त्याच्यासाेबत काम करणाऱ्या सहकाऱ्याने त्याला जेवायला बाेलावले. मात्र, संताेष याने ‘मला भूक नाही तुम्ही जेवून घ्या’ असे सांगितले. त्यामुळे त्याचा सहकारी जेवायला गेला. त्यानंतर दुपारी १:४३ वाजण्याच्या दरम्यान पाण्यात काहीतरी पडल्याचा आवाज आला.

ते पाहण्यासाठी त्याचा सहकारी गेला. त्यावेळी संताेष हा पाण्यात पाेहत असल्याचे सहकाऱ्याला कळले. मात्र, थाेड्या वेळाने ताे पाण्यात बुडत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर सहकाऱ्यांनी किनाऱ्यावरील लाेकांना आवाज देऊन वाचविण्यासाठी हाक मारली.

लाेकांनी घटनास्थळी धाव घेऊन संताेष याला पाण्यातून बाहेर काढले. त्याला आबलाेली येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

तेथील डाॅक्टरांनी त्याला तपासून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या प्रकरणी गुहागर पाेलिस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नाेंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *