दंडनगरी येथील एका घराला लागलेल्या आगीत छप्पर जळून खाक झाले. यामध्ये घरातील धान्य, पैसे, दागिने, कपडे जळून गेले. आगीची बातमी कळताच परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेत आग आटोक्यात आणली;
मात्र तोपर्यंत घराचे लाकडी छप्पर व माळ्यावर ठेवलेले सर्व साहित्य जळून गेले.
दंडनगरी येथील परेश धोंडू शेळके व कुटुंब कामानिमित्त मुंबईत असल्याने हे घर बंद होते.
घरातून अचानक आगीचे लोळ बाहेर येऊ लागले. काही वेळातच घराच्या लाकडी छप्पराने पेट घेत पूर्ण घर आगीच्या विळख्यात सापडले.
गावातील ग्रामस्थ तसेच कोंडगाव मोहल्ल्यातील ग्रामस्थांना समजताच घटनास्थळी धाव घेतली तसेच आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत घराचे छप्पर व माळ्यावर ठेवलेले धान्य, कपडे, दागदागिने व पैसे जळून खाक झाले होते.
घराच्या भिंती फक्त शिल्लक राहिल्या आहेत. घडलेल्या घटनेत किती नुकसान झाले हे पंचनामा झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे तसेच ही आग नेमकी कशामुळे लागली, याची स्पष्टता झाली नाही.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संतोष गोवळे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रघुनाथ पोस्टुरे, युवासेनेचे गणेश बिल्लार, विश्वनाथ टक्के, अभय पिचुर्ले यांनी दंडनगरी येथे घटनास्थळी भेट दिली.
सिलेंडर बाहेर काढल्याने अनर्थ टळला
घराला लागलेल्या आगीची माहिती मिळताच आलेल्या ग्रामस्थांनी धाडस दाखवून मागच्या बाजूच्या दरवाजाने आत जात गॅस सिलेंडर बाहेर काढण्यात यश मिळवले. परिणामी, मोठा अनर्थ टळला.
आजुबाजूच्या घरांना धोका निर्माण झाला होता. आग आटोक्यात आणण्यासाठी विशेषतः कोंडगाव मोहल्ल्यातील ग्रामस्थांनी धावपळ केली.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















