राजापूर : मुलाचा वडिलांवर कोयतीने वार

banner 468x60

मद्य पिऊन आलेल्या मुलानेच वडिलांना शिवीगाळ करून कोयतीने वार केले. यामध्ये जखमी झालेल्या वडिलांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे.

संशयित मुलाविरुद्ध राजापूर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. नीलेश महादेव कोकरे (वय २६, रा. तिठवली, ता. राजापूर) असे संशयिताचे नाव आहे.

ही घटना शुक्रवारी (ता. २७) दुपारी पावणेदोनच्या सुमारास तिठवली येथे घरी घडली. महादेव लक्ष्मण कोकरे (वय ५०, रा. तिठवली, ता. राजापूर) असे जखमी झालेल्या वडिलांचे नाव आहे. नीलेश अविवाहित असून त्याला दारूचे व्यसन आहे.

शुक्रवारी दुपारी तो दारू पिऊन घरी आला व वडिलांकडे ५०० रुपये मागू लागला, वडिलांनी पैसे देतो जरा थांब असे म्हटल्याचा राग येऊन नीलेशने कपाटावर लाथ मारून कपाट फोडले. कपाट का फोडलेस असे विचारले असता त्याने घरातील कोयतीने वडिलांवर वार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *