संगमेश्वर : अवैधरीत्या गुरे वाहतूक करणाऱ्या दोघांवर गुन्हा

banner 468x60

कत्तलीसाठी अवैधरीत्या गुरांची वाहतूक करणाऱ्या दोघांना गुरुवारी संगमेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतले.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

पाच बैल आणि टेम्पो संगमेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. संगमेश्वर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, अमोल आकाराम कांबळे (वय ३८) आणि अक्षय शामराव पाटील (वय २४, रा. सावर्डे खुर्द, तालुका शाहूवाडी) हे दोघे टेम्पोतून (एमएच ०९, ईएम २६५४) गुरांची वाहतूक करत होते.

पाच बैल गाडीच्या हौद्यामध्ये दाटीवाटीने कमी जागेत दोरीने बांधून जनावरे वाहतुकीचा परवाना नसताना वाहतूक करीत असल्याचे पोलिसांना आढळून आले.

पोलिस निरीक्षक सुरेश गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी किशोर जोयशी, सचिन कामेरकर, विनय मनवल, गणेश विक्कड, चालक सिद्धेश अंब्रे, रोहित पाटील आदींनी सापळा रचून गुरुवारी सकाळच्या दरम्यान ही कारवाई केली. संगमेश्वर

ते देवरूख जाणाऱ्या रोडवरील लोवले सीमेची वाडी या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली असून याबाबत संगमेश्वर पोलिस ठाण्यात गणेश बाबासाहेब बिक्कड यांनी फिर्याद दिली आहे.

त्यानुसार अमोल कांबळे व अक्षय पाटील या दोघांविरुद्ध संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *