Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

रत्नागिरीत : एसटीच्या सीएनजी गाड्यांची सेवा सुरू होणार, लवकरच 60 सीएनजी बसेस

banner 468x60

एसटी महामंडळ हळुहळू कात टाकत आहे. काळानरुप महामंडळाने आपल्या सेवेत आणि गाड्यांमध्ये बदल केला आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदाई व्हावी, यासाठी आधुनिक आणि चांगल्या दर्जाच्या गाड्या एसटीच्या ताफ्यात आल्या आहेत.

आता लवकरच एसटीच्या ताफ्यात सीएनजी गॅसवर चालणाऱ्या ६० गाड्या दाखल होणार आहेत. त्यापैकी १५ गाडा सीएनजीच्या बांधणीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. एसटी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी ही माहिती दिली. त्यामुळे एसटीचा डिझेलवरील खर्च आणि प्रदूषण कमी होणार आहे.

banner 728x90

राज्यात नाशिक, मुंबई, पुणे आदी ठिकाणी एसटी महामंडळाच्या सीएनजी गाड्या सुरू आहे. कोकणात रायगडनंतर लवकरच रत्नागिरीतही एसटीच्या सीएनजी गाड्यांची सेवा सुरू होणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यासाठी ६० सीएनजी गाड्यांचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी पहिल्या १५ गाड्या सीएनजी बांधणीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. लवकरच त्या गाड्या येण्याची शक्यता आहे. केंद्र व राज्य शासनाने इंधनावरील खर्च आणि वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी सीएनजी गॅसवर चालणाऱ्या गाड्यांना प्राधान्य दिले आहे.

दुचाकी, तीन चाकी, चार चाकी गाड्यांवरून आता अवजड वाहने देखील सीएनजीवर चालत आहेत. त्यामुळे एसटी महामंडळानेही सीएनजी गाड्यांना अधिक पसंती दिली आहे. यामुळे एसटीचा डिझेलवरील होणारा खर्च कमी होणार आहे. धुरामुळे होणारे प्रदुषणही टाळुण पर्यावरण संवर्धनाला मदत होणार आहे.

पहिल्या टप्प्यात जिल्ह्याला ६० एसटी गाड्यांना सीएनजी बसविण्यात येणार आहे. त्यापैकी १५ गाड्या सीएनजीच्या बांधणीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *