Breaking News
संगमेश्वर : मुंबई-गोवा महामार्गाच्या खोदाईचा फटका, दरड कोसळली, कोळंबेतील कमळजाबाई हायस्कूलवर दरडीचे संकट, 400 विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका चिपळूण: वशिष्ठी नदीच्या वाढत्या पाण्यात अडकलेल्या कुटुंबाची सुटका, पालिका प्रशासनाच्या तत्परतेमुळे टळली दुर्घटना मंडणगड-म्हाप्रळ मार्गावर शेनाळेजवळ दरड कोसळली वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल दाभोळमध्ये खळबळ – अल्पवयीन मुलीवर ढोरसईमधील नराधमाकडून अत्याचार, पीडिता 5 महिन्याची गरोदर राहिल्याने दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल खेडच्या पुरे बुद्रुकमध्ये जिल्हा परिषद शाळेची इमारत कोसळली; दोन वर्षांपासून नवीन इमारतीची प्रतीक्षा, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

संगमेश्वर : कार थेट 50 फूट खोल दरीत कोसळली

banner 468x60

संगमेश्वर येथे मोठा अपघात झाला आहे. वाहनावरील नियंत्रण सुटून कार 50 फूट खोल दरीत कोसळून अपघात झालाय. ही घटना रविवारी (२० ऑगस्ट) सकाळी १०:०० वाजता घडली.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

banner 728x90

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

हा अपघात देवरूख साखरपा मार्गावरील वांझोळे येथे झाला. या अपघातात कोणाला गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र, वाहनाचे नुकसान झाले आहे.

लालबाग येथील कारचालक गणपतीपुळेला जाण्यासाठी देवरूख- साखरपा मार्गावरून प्रवास करत होते. वांझोळे येथे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट ५० फूट खोल दरीत कोसळली.

हा प्रकार निदर्शनास येताच ग्रामस्थ, रिक्षाचालक साखरपा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. कारमध्ये अडकलेले प्रवासी काचा फोडून बाहेर आले. ग्रामस्थांनी रस्सीच्या साहाय्याने या प्रवाशांना दरीतून बाहेर काढले. कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सुदैवाने प्रवाशांना गंभीर दुखापत झालेली नाही.

या अपघाताची नोंद पोलिस स्थानकात करण्यात आलेली नाही. त्यामुळे चालक व प्रवाशांची नावे मिळू शकलेली नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *