मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भोस्ते घाटात आज शुक्रवारी दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास कार आणि कंटेनर ट्रकचा अपघात झाला. गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कारला भरधाव कंटेनरने पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेमुळे कार महामार्गावरून खाली गेली. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसून मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही वाहने मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होती. कार (क्रमांक यूपी १४ ईआर ३७२९) भोस्ते घाटातील ब्लाइंड स्पॉटवरून पुढे जात असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या कंटेनर ट्रकने (क्रमांक एचआर ५५ एएफ १७३६) कारला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की कार महामार्गावरून खाली गेली. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि खेड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहनांमुळे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी आवश्यक कार्यवाही केली.
भोस्ते घाटातील ब्लाइंड स्पॉट आणि अवघड वळणांवर वाहनचालकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज या अपघातातून पुन्हा अधोरेखित झाली आहे. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसल्याने मोठी जीवितहानी टळली.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













