Breaking News
खेड : भोस्ते घाटात कारला कंटेनरची पाठीमागून जोरदार धडक, कार महामार्गावरून खाली, कारचे मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली चिपळूण : कटरे येथे वादातून शेतकऱ्याला मारहाण, लाकडी दांडक्याच्या प्रहारात कानाला दुखापत, लाथ मारून ढकलले, त्यानंतर दांडक्याने हल्ला, वैभव शिर्केविरोधात सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल राजापूर : 28 वर्षीय तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल, पत्नीला बाहेर जाऊन येतो सांगून घरातून पडला बाहेर दापोली : आंजर्लेच्या खाडीत रेती माफियांचा रात्रीस खेळ! आंजर्लेच्या खाडीत रात्रभर रेती उपसा, तरीबंदर ते गणेश गल्लीपर्यंत रेती उपशाच्या तक्रारी समोर, महसूल विभागाचे दुर्लक्ष? चिपळूण : तालुक्यात दोन घरफोड्या; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह 4 लाख 26 हजारांचा मुद्देमाल चोरीला

राजापूर : 28 वर्षीय तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल, पत्नीला बाहेर जाऊन येतो सांगून घरातून पडला बाहेर

banner 468x60

राजापूर तालुक्यातील कोंडये खालचीवाडी येथील २८ वर्षीय तरुण गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता असल्याची घटना समोर आली आहे. निनाद किशोर शिवगण असे या तरुणाचे नाव असून, त्याचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निनाद शिवगण हा २० नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पत्नी तेजल शिवगण हिला बाहेर जाऊन येतो, असे सांगून घरातून बाहेर पडला होता. मात्र, त्यानंतर तो घरी परतला नाही. कुटुंबीयांनी तसेच नातेवाईकांनी त्याचा विविध ठिकाणी शोध घेतला. मात्र, सहा दिवस उलटूनही त्याचा कुठेही शोध लागलेला नाही.

या पार्श्वभूमीवर निनादचे वडील किशोर गणपत शिवगण (वय ५५, रा. कोंडये खालचीवाडी, ता. राजापूर) यांनी राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने निनाद याला गुप्तपणे व गैरकायदेशीररीत्या डांबून ठेवण्याच्या उद्देशाने त्याचे अपहरण केले असावे, असा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे.

या तक्रारीवरून २६ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २.३८ वाजता गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १४०(३) प्रमाणे अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, निनाद शिवगण याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर असून, तो नेमका कुठे गेला आणि त्याच्यासोबत काय घडले, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास राजापूर पोलीस करीत आहेत.