दापोली शहरासह तालुक्यातील वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास खंडित झालेला वीजपुरवठा रात्री ८ वाजेपर्यंतही पूर्ववत झाला नसल्याने संपूर्ण दापोली अंधारात गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दिवसभर वीज नसताना संध्याकाळनंतरही अंधार कायम राहिल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सकाळपासून वीजपुरवठा बंद असल्याने घरगुती कामांसह व्यावसायिक कामकाजावरही परिणाम झाला आहे. दिवसभर वीज नसल्याने नागरिकांची गैरसोय झालीच, मात्र संध्याकाळनंतरही वीजपुरवठा सुरू न झाल्याने नागरिकांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.
वीजपुरवठा नेमका कशामुळे खंडित झाला, तो कधी पूर्ववत होणार, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येमुळे महावितरणच्या कारभाराबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
दापोलीतील वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिक हैराण झाले असतानाच महावितरणकडून नुकत्याच मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी आणखी साधारण एक तास लागण्याची शक्यता आहे.
दापोलीसारख्या तालुक्याच्या ठिकाणी दिवसभर वीजपुरवठा खंडित राहणे ही गंभीर बाब असून, महावितरणने वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दिवसभर वीज गायब आणि रात्रीही अंधार कायम! महावितरणच्या या कारभारामुळे दापोलीकरांचा संयम सुटत असून वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करण्याची मागणी जोर धरत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













