Breaking News
खेडमध्ये भरदिवसा घरफोडी, सोन्याचे दागिने, रोख रकमेसह 1 लाख 42 हजारांचा मुद्देमाल चोरीला मंडणगड : उबाठा गटासह राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार, अनेक ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेशदेव्हारेचे माजी सरपंच अमृत बर्जे यांच्यासह वडवली ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश महाड : दिवा-रत्नागिरी पॅसेंजरमधून पडून संगमेश्वरमधील २८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, महाडमधील कावळे गावाजवळ दुर्घटना खेड : सात वर्षीय मुलावर लोखंडी रॉडने हल्ला, महिलेचा शोध सुरू, मैदानात खेळण्यासाठी जात असताना मागून येऊन डोक्यावर केला वार चिपळूण : येण्या-जाण्याच्या रस्त्यावरून वाद पेटला; फावड्याने तिघांवर हल्ला, घटनेमुळे खळबळ

खेडमध्ये भरदिवसा घरफोडी, सोन्याचे दागिने, रोख रकमेसह 1 लाख 42 हजारांचा मुद्देमाल चोरीला

banner 468x60

खेड तालुक्यातील शिव बुद्रुक मोहल्ला येथे घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचे लॉक आणि कोयंडा हत्याराने तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील लाकडी कपाटातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख ४२ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमद महम्मद परकार (वय ५६, व्यवसाय शेती, रा. शिव बद्रक मोहल्ला, ता. खेड) यांनी याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या मावस भावाचे घर त्यांच्या शेजारीच असून, २२ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ८.४० वाजण्यापूर्वी अज्ञात चोरट्याने या घराला लक्ष्य केले.


चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचे लॉक आणि कोयंडा कोणत्यातरी हत्याराने तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील लाकडी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि अन्य साहित्य चोरून नेले.
चोरीला गेलेल्या मुद्देमालाचा तपशील :
दोन सोन्याच्या चेन – प्रत्येकी २२ हजार ५०० रुपये, एकूण ४५ हजार रुपये.
तीन सोन्याच्या अंगठ्या – प्रत्येकी ९ हजार रुपये, एकूण २७ हजार रुपये.
सोन्याच्या कानातील तीन जोड पुळ्या – प्रत्येकी ११ हजार २५० रुपये, एकूण ३३ हजार ७५० रुपये.
रोख रक्कम – ५ हजार रुपये.
एचपी कंपनीचा गॅस सिलेंडर – १ हजार ५०० रुपये.
एक्साईड कंपनीच्या तीन इन्व्हर्टर बॅटरी – ३० हजार रुपये.
अॅल्युमिनियम व तांब्याची आठ भांडी – ५ हजार रुपये.
अशा प्रकारे एकूण १ लाख ४२ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. चोरीला गेलेले बहुतांश दागिने आणि साहित्य जुने वापरते असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.


या प्रकरणी २२ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.०७ वाजता खेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३६१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५(अ) प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


घराचे कुलूप आणि कोयंडा तोडून चोरट्याने केलेल्या या चोरीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याचे आव्हान आता खेड पोलिसांसमोर आहे.