चिपळूण तालुक्यातील आबिटगाव-बौद्धवाडी येथे कीटकनाशक औषध प्राशन केल्याने ५० वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. प्रभाकर गणपत पवार (वय ५०, रा. आबिटगाव-बौद्धवाडी, ता. चिपळूण) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ५ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली असून, ७ नोव्हेंबर २०२६ रोजी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाकर पवार यांना दारूचे व्यसन होते. ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास ते दारू पिऊन आबिटगाव येथील आपल्या घरी आले होते. त्यानंतर काही वेळातच त्यांना उलट्या होऊ लागल्या. तसेच त्यांच्या तोंडातून उग्र वास येत असल्याचे नातेवाइकांच्या निदर्शनास आले.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन खबर देणाऱ्या प्रियंका राजेश जाधव यांच्या आईने प्रभाकर पवार यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी कीटकनाशक औषध प्राशन केल्याने विषबाधा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, डॉक्टरांकडून उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची नोंद ७ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९.५५ वाजता चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक २६/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ प्रमाणे करण्यात आली आहे.
प्रभाकर पवार यांनी कीटकनाशक औषध कोणत्या कारणातून प्राशन केले, याबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही. या घटनेचा पुढील तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













