चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे खुर्द येथील सुतारवाडी परिसरात आंबा-काजूच्या बागेतील विहिरीत पडलेल्या दुर्मिळ पिसोरी हरणाची वन विभागाच्या बचाव पथकाने सुरक्षित सुटका केली. विशेष म्हणजे, सुरुवातीला विहिरीत पडलेला प्राणी ससा असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्ष पाहणी केली असता तो दुर्मिळ पिसोरी हरीण (Mouse Deer) असल्याचे स्पष्ट झाले. सुटका केल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि प्रकृती उत्तम असल्याची खात्री करून त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

ही घटना शनिवार, दि. ७ नोव्हेंबर २०२६ रोजी मार्गताम्हाणे खुर्द पैकी सुतारवाडी येथे घडली. येथील रहिवासी प्रताप सुर्वे यांच्या मालकीच्या आंबा-काजूच्या बागेतील विहिरीमध्ये एक वन्यप्राणी पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने याची माहिती चिपळूणचे वनपाल एस. एस. सावंत यांना दिली.

माहिती मिळताच वन विभागाच्या बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यामध्ये एस. एस. सावंत, वनपाल चिपळूण, राहुल गुंठे, वनरक्षक रामपूर, कृष्णा इरमले, वनरक्षक कोळकेवाडी आणि RRT टीमचे सदस्य अथर्व घाग यांचा समावेश होता.
बचाव पथकाने विहिरीत पडलेल्या प्राण्याची पाहणी केली असता तो दुर्मिळ पिसोरी हरीण असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याची सुरक्षित सुटका करण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले. यावेळी पिसोरी हरणाने विहिरीतील पाण्यात उडी मारून पोहण्यास सुरुवात केली. त्यामुळे बचावकार्य अधिक काळजीपूर्वक करावे लागले.
वन विभागाच्या पथकाने अथक प्रयत्न करत जाळीच्या साहाय्याने या हरणाला सुरक्षितपणे पकडले. त्यानंतर त्याला पिंजऱ्यात ठेवून त्याची वैद्यकीय आणि शारीरिक स्थिती तपासण्यात आली. तपासणीत पिसोरी हरीण सुस्थितीत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले.
हे बचावकार्य विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड आणि चिपळूणचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. खान यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले.
वन विभागाच्या तत्परतेमुळे दुर्मिळ वन्यजीवाला जीवदान मिळाले असून, या बचावकार्याचे परिसरातून कौतुक होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*














mostbet вывести деньги Кыргызстан mostbet28878.shop