Breaking News
खेडमधील उद्योजक उत्तमकुमार जैन यांच्या कार तोडफोड प्रकरणाचा छडा, तीन आरोपी अटकेत, पाचपैकी तिघांना अटक दापोली : धक्कादायक 50 वर्षीय व्यक्तीविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल, लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याचा आरोप, इच्छेविरुद्ध गर्भपात घडविल्याची तक्रार, पीडितेच्या मुलालाही जीवे मारण्याची धमकी मंडणगड : पंचायत समितीच्या सभापतींना मिळाले हक्काचे नवे वाहन, तालुक्यातील दौऱ्यांसाठी होणारी गैरसोय दूर चिपळूण : पोफळीतील वीज मंडळाच्या वसाहतीत घरफोडी, पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास चिपळूण : पोफळी नाका येथे मटका जुगारावर पोलिसांची कारवाई, एकावर गुन्हा दाखल

खेडमधील उद्योजक उत्तमकुमार जैन यांच्या कार तोडफोड प्रकरणाचा छडा, तीन आरोपी अटकेत, पाचपैकी तिघांना अटक

banner 468x60

खेड शहरातील प्रसिद्ध उद्योजक उत्तमकुमार जैन यांच्या कारची कळंबणी येथील महानगर गॅस सीएनजी पंपावर तोडफोड केल्याप्रकरणी खेड पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत पाचपैकी तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या या गुन्ह्याच्या तपासाला महत्त्वाचे यश मिळाले आहे. या प्रकरणातील उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू आहे.

३१ मे २०२६ रोजी मध्यरात्री ही घटना घडली होती. यावेळी पाच जणांनी उत्तमकुमार जैन यांच्याशी वाद घालत त्यांचा मोबाईल आणि कारची चावी हिसकावून घेतली होती. तसेच त्यांच्या कारच्या दर्शनी काचेची तोडफोड केली होती. या घटनेनंतर संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. सहा पोलीस निरीक्षक पी. एस. येवले, दीपक गोरे, व्ही. एस. सातर्डेकर, किरण सकपाळे, सोहेल ढगे आणि विकास पवार यांनी तपासात विशेष मेहनत घेतली. या तपासादरम्यान पाचपैकी तीन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले.

दरम्यान, या गुन्ह्यात वापरण्यात आलेली पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार (क्रमांक MH 04 MR 6572) पोलिसांनी जप्त केली आहे. उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती खेड पोलिसांनी दिली.

अनेक महिन्यांपूर्वी घडलेल्या या प्रकरणाचा तपास पुढे नेत तीन आरोपींना अटक केल्याने खेड पोलिसांच्या कारवाईची चर्चा होत आहे. उर्वरित आरोपींना अटक करण्याच्या दृष्टीने पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *