मंडणगड पंचायत समितीच्या सभापतींसाठी अखेर नवीन वाहन उपलब्ध झाले आहे. राज्याचे राज्यमंत्री तथा आमदार नामदार योगेश कदम यांच्या हस्ते २९ ऑक्टोबर २०२६ रोजी दापोली येथे हे वाहन सभापती प्रणाली चिले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. मंडणगड पंचायत समितीकडे सभापतींसाठी स्वतंत्र वाहन उपलब्ध नसल्याने तालुक्यातील विविध भागांचा दौरा करताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन नामदार योगेश कदम यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने सभापतींसाठी नवीन वाहन उपलब्ध झाले आहे.
नवीन वाहनामुळे आता पंचायत समितीच्या सभापतींना तालुक्यातील विविध गावांना भेटी देणे, विकासकामांची पाहणी करणे तसेच नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रवास करणे अधिक सुलभ होणार आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून जाणवत असलेली वाहनाची अडचण दूर झाली असून पंचायत समितीच्या कामकाजालाही यामुळे गती मिळण्यास मदत होणार आहे.
दापोली येथे आयोजित वाहन प्रदान कार्यक्रमाला नामदार योगेश कदम, जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, पंचायत समिती सभापती प्रणाली चिले, जिल्हा परिषद सदस्य प्रताप घोसाळकर, उपसभापती दीपक मालुसरे, पंचायत समिती सदस्य . दीप्ती घडशी, इरफान बुरोंडकर, वसीम चिपोलकर, दौस्त चौगुले, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्र आंधळे यांच्यासह मंडणगड तालुक्यातील शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभापतींसाठी स्वतंत्र वाहन उपलब्ध झाल्याने मंडणगड पंचायत समितीच्या प्रशासकीय कामकाजासह ग्रामीण भागातील विकासकामांच्या आढाव्यासाठी होणारा प्रवास अधिक सोयीचा होणार आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













