दापोली शहरातील आझाद मैदान येथे सार्वजनिक ठिकाणी मद्यपान केल्याप्रकरणी दोन व्यक्तींविरुद्ध दापोली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई २८ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ९.०५ वाजण्याच्या सुमारास आझाद मैदान येथे राहिल हसन सय्यद (वय २७, रा. भारतनगर, दापोली) हा सार्वजनिक ठिकाणी रॉयल स्टॅग दारूची बाटली घेऊन मद्यपान करताना आढळून आला. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र बबन लहामगे यांनी फिर्याद दिली असून, गुन्हा रजिस्टर क्रमांक २३६/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच, रात्री ९.१२ वाजण्याच्या सुमारास याच मैदानावर ताजउद्दीन फकिर चिपळूणकर (वय ५२, रा. मच्छी मार्केट, दापोली) हा देशी संत्रा दारूची बाटली घेऊन सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करताना आढळून आला. या प्रकरणीही पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र लहामगे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक २३५/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही प्रकरणांची नोंद २८ ऑक्टोबर रोजी दापोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













