खेडमधून 47 वर्षीय व्यक्ती बेपत्ता; अपहरणाचा संशय, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

banner 468x60

खेड शहरातील महाडनाका परिसरातून ४७ वर्षीय व्यक्ती बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. महेश सोनु आग्रे असे या व्यक्तीचे नाव असून, त्यांच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून खेड पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश आग्रे हे महाडनाका येथील सरिता अपार्टमेंटमध्ये कुटुंबासह राहतात. २६ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी चारच्या सुमारास ते पत्नीला बाहेर जाऊन लगेच परत येतो, असे सांगून घराबाहेर पडले. मात्र, बराच वेळ उलटूनही ते घरी परतले नाहीत.

कुटुंबीयांनी नातेवाईकांसह परिसरात त्यांचा शोध घेतला; मात्र त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर त्यांचा मुलगा वेदांत महेश आग्रे (वय २०) याने २७ ऑक्टोबर रोजी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम १४०(३) अन्वये अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे. महेश आग्रे यांचा शोध सुरू असून, या प्रकरणाचा पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *