दापोली : नदीकिनारी 62 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला, मृत्यूचे कारण अस्पष्ट

banner 468x60

दापोली तालुक्यातील करजगाव-तामसतीर्थ येथील नदीकिनारी ६२ वर्षीय व्यक्ती मृतावस्थेत आढळून आल्याची घटना २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी उघडकीस आली. गजानन सहदेव सर्वे (वय ६२, रा. लाडघर, चंडीकावाडी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गजानन सर्वे यांना दारूचे व्यसन होते. ते २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास घराच्या मजुरीच्या कामासाठी बाहेर पडले होते. मात्र, ते घरी परतले नव्हते.

दरम्यान, २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.२० वाजण्यापूर्वीच्या सुमारास ते करजगाव-तामसतीर्थ येथील नदीकिनारी मृतावस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ८१/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.

गजानन सर्वे यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची पुढील कार्यवाही पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *