राज्याचे मुख्य सचिव राजेश अगरवाल यांनी शुक्रवारी सपत्नीक दापोली दौऱ्यादरम्यान दापोली शहराजवळील जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा, गिम्हवणे येथे भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शाळेतील डिजिटल क्लासरूम तसेच अद्ययावत डिजिटल स्टडी क्लासरूम असलेल्या आयडियल सेंटरची पाहणी करून तेथील शैक्षणिक सुविधांची माहिती घेतली.

मुख्य सचिव राजेश अगरवाल यांनी शाळेतील विद्यार्थ्यांशी आपुलकीने संवाद साधत त्यांच्या शिक्षणाविषयी जाणून घेतले. डिजिटल माध्यमातून विद्यार्थ्यांना कशा प्रकारे शिक्षण दिले जाते, याचीही त्यांनी पाहणी केली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अधिक चांगल्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शाळेत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची त्यांनी माहिती घेतली.

यावेळी शाळेतील दोन दिव्यांग विद्यार्थ्यांची त्यांनी विशेष आपुलकीने चौकशी केली. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी त्यांच्या शिक्षणाविषयी आणि शाळेतील अनुभवांविषयी जाणून घेतले. मुख्य सचिवांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधल्याने शाळेतील वातावरण उत्साहपूर्ण झाले होते.

या दौऱ्यावेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदाल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, प्रांताधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, तहसीलदार अर्चना बोंबे, गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, केंद्रप्रमुख सुनील कारखिले यांच्यासह अधिकारी, शिक्षक आणि पालक उपस्थित होते.

राज्याच्या मुख्य सचिवांनी ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधल्याने शाळेतील शैक्षणिक उपक्रमांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. डिजिटल क्लासरूम आणि आयडियल सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांची या भेटीदरम्यान पाहणी करण्यात आली.


वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













