गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथे महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या २० वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंजली अमोल पाटील (वय अंदाजे २० वर्षे, मूळ रा. कराड, जि. सातारा) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. मंगळवारी, २० ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे महाविद्यालयीन वर्तुळासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंजली पाटील ही वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होती. शिक्षणासाठी ती ओझरवाडी, वेळणेश्वर येथे सिताराम सोमा मोरे यांच्या घरात भाड्याने खोली घेऊन राहत होती. मंगळवारी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास ती आपल्या खोलीत असताना गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.
या घटनेची माहिती मिळताच घरमालक सिताराम मोरे यांनी तातडीने पोलिसांना कळवले. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आवश्यक पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू क्रमांक ४४/२०२६ अशी नोंद करण्यात आली आहे.
अंजलीने हे टोकाचे पाऊल नेमक्या कोणत्या कारणामुळे उचलले, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. या घटनेमागील परिस्थितीचा शोध घेण्यासाठी गुहागर पोलीस पुढील तपास करत आहेत. तरुण विद्यार्थिनीच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













