रत्नागिरी : देशाची सुरक्षा आणि नागरिकांच्या संरक्षणासाठी कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर पोलीस अधिकारी व अंमलदारांना पोलीस स्मृतिदिनानिमित्त रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. रत्नागिरी येथील पोलीस कवायत मैदानावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात शोकशस्त्र सादर करून करण्यात आली. त्यानंतर देशाच्या विविध भागांत कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या १५४ शूर पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या नावांचे वाचन करण्यात आले. उपस्थित मान्यवर आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी दोन मिनिटे मौन पाळून शहीद पोलिसांच्या स्मृतींना अभिवादन केले.

या कार्यक्रमाला भारतीय तटरक्षक दलाचे कमांडंट शैलेश गुप्ता, रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्यासह जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, अंमलदार आणि मंत्रालयीन कर्मचारी उपस्थित होते.

देशाच्या सुरक्षेसाठी आणि नागरिकांच्या रक्षणासाठी शहीद झालेल्या पोलिसांचे शौर्य, त्याग आणि कर्तव्यनिष्ठा सदैव प्रेरणादायी राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. शहीद पोलिसांच्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करत त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

शौर्याला सलाम, बलिदानाला अभिवादन! पोलीस स्मृतिदिनाच्या निमित्ताने रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या वीर पोलिसांना विनम्र अभिवादन केल

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*











