दापोली तालुक्यातील नानटे-जांभळवाडी येथून ३५ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिल्पा संदेश भेकरे (वय ३५, रा. नानटे-जांभळवाडी, ता. दापोली) असे बेपत्ता महिलेचे नाव आहे. याबाबत त्यांची सासू वैजयंती शिवाजी भेकरे (वय ५५) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, २० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास शिल्पा भेकरे या खेड तालुक्यातील किंजळे-कळकराय, पोस्ट शिंगरी येथील माहेरी जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडल्या. सायंकाळची वेळ असल्याने घराबाहेर जाऊ नये, असे त्यांच्या पतीने त्यांना सांगितले होते. मात्र, त्या घरातून निघून गेल्या.
त्यानंतर त्या माहेरी पोहोचल्या आहेत का, याची खात्री करण्यासाठी त्यांच्या आईकडे चौकशी करण्यात आली. मात्र, त्या घरी आल्या नसल्याचे समजले. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने नानटे आणि परिसरात त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र, त्या आढळून आल्या नाहीत.
अखेर या प्रकरणी २१ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ७ वाजून १२ मिनिटांनी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा रजिस्टर क्रमांक २२६/२०२६ असून, भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १४०(३) अन्वये अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी अज्ञात आहे.
बेपत्ता महिलेचा शोध सुरू असून, या प्रकरणाचा पुढील तपास दापोली पोलीस करीत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*











