दापोली नगरपंचायतीतील अस्थायी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गणेश कर्वे यांनी सुरू केलेले उपोषण अखेर स्थगित करण्यात आले. शुक्रवारी रात्री सुमारे ८.१५ वाजता नगराध्यक्ष कृपा घाग यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीनंतर कर्वे यांनी उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली.

अस्थायी कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करून त्यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी प्रसाद कर्वे यांनी सकाळपासून उपोषण सुरू केले होते. दिवसभर या उपोषणाची दखल घेत नगरपंचायत प्रशासन आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून चर्चा करण्यात आली.

नगराध्यक्ष कृपा घाग, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पेठकर, शहरप्रमुख सुनील रिसबूड, सुनील दळवी, प्रकाश साळवी, संजय सावंत, शशांक घाग तसेच नगरसेविका प्रीती शिर्के यांनी मध्यस्थी करत कर्वे यांच्याशी चर्चा केली. या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद देत प्रसाद कर्वे यांनी रात्री उपोषण स्थगित केले.
यावेळी “नगरपंचायतीच्या अस्थायी कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा, हीच आपली भूमिका आहे,” असे प्रसाद कर्वे यांनी सांगितले.
अस्थायी कर्मचाऱ्यांच्या नियमित सेवेत समावेशाचा प्रश्न आता पुढील कार्यवाहीकडे लागला असून, प्रशासनाकडून याबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













