Breaking News
रत्नागिरीत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू लांजा : उड्डाणपुलावर भरधाव मोटारीच्या धडकेत महामार्ग मजुराचा जागीच मृत्यू; चालकावर गुन्हा दाखल लांजा : एसटी चालकाचा प्रामाणिकपणा, सात लाखांचे दागिने प्रवाशाला सुखरूप परतलांजा-कल्याण प्रवासादरम्यान बसमध्ये राहिली मौल्यवान दागिन्यांची बॅग, गणेशोत्सवाच्या गर्दीतही चालकाने जपली माणुसकी चिपळूण : चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, पोट फुगल्याने उपचारासाठी नेत असताना प्रकृती बिघडली दापोलीत स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालयाला मंजुरीदापोली, खेड, मंडणगडचा समावेश, उत्तर रत्नागिरीतील नागरिकांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली

खेड : तालुक्यात 76 वर्षीय वृद्धाची आत्महत्या, आजारपण आणि आर्थिक परिस्थितीला कंटाळून टोकाचे पाऊल

banner 468x60

खेड तालुक्यातील कळंबणी-थोरेवाडी येथे ७६ वर्षीय वृद्धाने आपल्या राहत्या घराच्या पडवीतील लोखंडी खांबाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना २१ सप्टेंबर रोजी घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भागोजी सखाराम घाणेकर (वय ७६, रा. कळंबणी, थोरेवाडी, ता. खेड) यांनी आपल्या राहत्या घराच्या पडवीत असलेल्या लोखंडी खांबाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला.

ही घटना २१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजण्यापूर्वी घडल्याचे पोलिस नोंदीत नमूद करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आवश्यक कार्यवाही केली.

घाणेकर हे आजारपण तसेच आर्थिक परिस्थितीमुळे त्रस्त होते, अशी प्राथमिक माहिती पोलिस नोंदीत नमूद करण्यात आली आहे. याच कारणातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले आहे.

या घटनेची नोंद खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ८१/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *