दापोली : तालुका क्रीडा स्पर्धेत यू. ए. दळवी इंग्लिश मीडियम हायस्कूलची बॅडमिंटनमध्ये उल्लेखनीय कामगिरी

banner 468x60

दापोली तालुक्यात सध्या सुरू असलेल्या तालुका क्रीडा स्पर्धांमध्ये बॅडमिंटन खेळात यू. ए. दळवी इंग्लिश मीडियम हायस्कूल, दापोलीच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी करत १४ वर्षांखालील मुलींच्या गटात विजेतेपद पटकावले आहे. या शानदार कामगिरीमुळे शाळेची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

विजेत्या संघामध्ये कुमारी तुबा रिजवान खोत, कुमारी युसरा नाजीम काझी, कुमारी सदफ सदाकत खोत, कुमारी सिम्या हिदायत शिरगावकर आणि कुमारी रूशदा खालिद बुरोंडकर या विद्यार्थिनींचा सहभाग होता.

या विद्यार्थिनींच्या यशाबद्दल शाळेचे चेअरमन. खालिद अब्दुल्ला रखांगे, शाळा समितीचे सदस्य. नाझीम उस्मान काझी, संस्थेचे सेक्रेटरी. इकबाल परकार, संस्थेचे कौन्सिल चेअरमन. लियाकत रखांगे, मार्गदर्शक क्रीडा शिक्षक वसिउल्लाह दरवाजकर, मुख्याध्यापिका नुजहत मुस्तकीम रखांगे तसेच प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अमरा अलीम रखांगे यांनी अभिनंदन केले.

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत विजेतेपद संपादन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या 14 वर्षांखालील मुलींच्या बॅडमिंटन संघाला पुढील वाटचालीसाठी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *