Breaking News
दापोली : प्लास्टिकमुक्त दापोलीसाठी जेसीआय दापोलीचा पुढाकार 1800 हून अधिक कापडी पिशव्यांचे वाटप, ‘प्लास्टिकला नकार, कापडी पिशवीचा स्वीकार’चा संदेश रत्नागिरी : एसटीच्या रत्नागिरी विभागात 436 जागांसाठी शिकाऊ उमेदवारी भरती, 29 सप्टेंबरपर्यंत अर्ज भरता येणार चिपळूण : स्प्रिंग स्किन अँड कॉस्मेटॉलॉजी लेसर क्लिनिकमध्ये अत्याधुनिक एआय आधारित लेसर उपचार सुविधा, डॉ. यतिन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली त्वचा उपचारांना हायटेक टच दाभोळमध्ये भटक्या कुत्र्यांचा एकाच महिलेला महिनाभरात दुसऱ्यांदा चावा चिपळूण : अपरांत हॉस्पिटलमध्ये डॉ. मार्झिया अस्लम बिजले यांची फिजिओथेरपिस्ट म्हणून नियुक्ती

चिपळूण : अपरांत हॉस्पिटलमध्ये डॉ. मार्झिया अस्लम बिजले यांची फिजिओथेरपिस्ट म्हणून नियुक्ती

banner 468x60

फिजिओथेरपी आणि पुनर्वसन उपचार क्षेत्रातील आधुनिक व रुग्णकेंद्रित सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने चिपळूण येथील अपरांत हॉस्पिटलमध्ये डॉ. मार्झिया अस्लम बिजले (BPT, MPT) यांची फिजिओथेरपिस्ट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. मार्झिया अस्लम बिजले यांनी कृष्णा विश्व विद्यापीठातून Paediatric Neurosciences या विषयात मास्टर्स पदवी प्राप्त केली आहे. Paediatric Neuro-Rehabilitation, Developmental Rehabilitation तसेच Evidence-Based Physiotherapy या क्षेत्रांमध्ये त्यांना विशेष प्रावीण्य असून या विषयांमध्ये त्यांनी विशेष प्रशिक्षण घेतले आहे.

आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत त्या Rank Holder राहिल्या असून फिजिओथेरपी क्षेत्रातील संशोधन, शैक्षणिक सादरीकरणे तसेच विविध व्यावसायिक परिषदांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे.

बालरुग्णांच्या पुनर्वसनाबरोबरच प्रौढांमधील न्यूरोलॉजिकल आणि मस्क्युलोस्केलेटल समस्यांवरील उपचारांचा त्यांना अनुभव आहे. प्रत्येक रुग्णाची वैयक्तिक गरज, त्याची कार्यक्षमता आणि दैनंदिन जीवनातील स्वावलंबन यांचा विचार करून उपचारांचे नियोजन करण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

डॉ. मार्झिया बिजले यांच्या माध्यमातून न्यूरोलॉजिकल रिहॅबिलिटेशन, बालकांचे विकासात्मक पुनर्वसन, प्रौढांचे न्यूरोलॉजिकल रिहॅबिलिटेशन, मस्क्युलोस्केलेटल फिजिओथेरपी, फंक्शनल रिहॅबिलिटेशन तसेच Evidence-Based Physiotherapy या सेवा अधिक सक्षमपणे उपलब्ध होणार आहेत.

या नियुक्तीमुळे न्यूरोलॉजिकल समस्या असलेली मुले, विकासात्मक विलंब असलेली बालके तसेच न्यूरोलॉजिकल आणि मस्क्युलोस्केलेटल समस्यांनी त्रस्त असलेल्या प्रौढ रुग्णांसाठी आधुनिक पुनर्वसन उपचारांची सुविधा अधिक व्यापक होणार आहे.

रुग्णाला केवळ उपचार देणे नव्हे, तर त्याला अधिक सक्षम, कार्यक्षम आणि स्वावलंबी बनविणे, हा उपचारपद्धतीचा केंद्रबिंदू असल्याचे डॉ. मार्झिया बिजले यांनी नमूद केले आहे.

अपरांत हॉस्पिटलच्या विस्तारित फिजिओथेरपी व रिहॅबिलिटेशन सेवेत डॉ. मार्झिया अस्लम बिजले यांच्या नियुक्तीमुळे चिपळूण आणि परिसरातील रुग्णांना विशेष प्रशिक्षण व आधुनिक दृष्टिकोन असलेल्या फिजिओथेरपी सेवांचा लाभ मिळणार असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *