दापोली : डेपोची ‘ई-शिवाई’ बस बंद पडल्याने प्रवाशांची गैरसोय

banner 468x60

मंडणगडहून दापोलीकडे येणारी दापोली डेपोची ई-शिवाई एसटी बस आज बुधवारी दापोली-मंडणगड महामार्गावरील खोंडा परिसरात पेट्रोल पंपाजवळ अचानक बंद पडल्याची घटना घडली. ऐन प्रवासात बस ब्रेकडाऊन झाल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.


पर्यावरणपूरक आणि आधुनिक प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक बसमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. बस बंद पडल्यामुळे प्रवाशांचे वेळापत्रक कोलमडत असून, पर्यायी वाहतूक व्यवस्था तातडीने उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

ई-शिवाई बस वारंवार बंद पडण्याच्या प्रकाराची एसटी प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन तांत्रिक बिघाडाचे कायमस्वरूपी निराकरण करावे. तसेच प्रवाशांना वेळेवर आणि सुरळीत सेवा मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *