गुहागर तालुक्यातील बुदल-बोऱ्या समुद्रकिनारी खडकांमध्ये गुरुवारी (३ सप्टेंबर) सुमारे ४५ वर्षीय अनोळखी पुरुषाचा धड नसलेला व कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० वाजण्यापूर्वी बुदल-बोऱ्या समुद्रकिनारी खडकांमध्ये हा मृतदेह आढळून आला. मृत व्यक्ती पुरुष असून त्याचे अंदाजे वय ४५ वर्षे असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून धडाचा काही भाग नसल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी आवश्यक कार्यवाही सुरू केली. मृत व्यक्तीचे नाव, गाव तसेच अन्य ओळख अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे हा मृतदेह नेमका कोणाचा आहे आणि तो समुद्रकिनारी कसा आला, याबाबत सध्या कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.
या प्रकरणी आकस्मिक मृत्यू क्रमांक ३८/२०२६ अन्वये बी.एन.एस.एस. कलम १९४ अंतर्गत ३ सप्टेंबर रोजी रात्री ९.११ वाजता नोंद करण्यात आली आहे. मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. शवविच्छेदन तसेच इतर वैद्यकीय तपासणीनंतर मृत्यूचे नेमके कारण आणि अन्य बाबी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













