दापोली : आझाद मैदानात सार्वजनिक ठिकाणी दारू सेवन, दोघांवर गुन्हा

banner 468x60

दापोली शहरातील आझाद मैदान येथे सार्वजनिक ठिकाणी दारूचे सेवन करणाऱ्या दोघांवर दापोली पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ अन्वये दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिली घटना २० ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. आझाद मैदान येथे राघव अरविंद पटेल (वय २७, रा. टाळसुरे बौद्धवाडी, ता. दापोली) हा सार्वजनिक ठिकाणी LONDON PILSNER बिअरचे सेवन करताना आढळून आला. याप्रकरणी पोहेकॉ ज्ञानेश्वर साखाराम साखरकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक १६७/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

दुसरी घटना त्याच दिवशी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. रोशन रविंद्र बेर्डे (वय २९, रा. काळकाईकोंड, ता. दापोली; मूळ रा. माथेगुजर नानटे, ता. दापोली) हा आझाद मैदानातील सार्वजनिक ठिकाणी ROMANO व्होडकाचे सेवन करताना आढळून आला.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल धनाजी भास्कर देवकुळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक १६८/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन केल्याप्रकरणी दापोली पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *