मराठी उद्योजकतेला चालना देणे, नवउद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि महाराष्ट्रातील उद्योजकांमध्ये परस्पर सहकार्याची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘शिवस्वराज्य मराठी उद्योग परिषद’ व ‘ग्लोबल महाराष्ट्र उद्योजक सन्मान सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमात राज्यातील मराठी उद्योजकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
मराठी उद्योजकता विकासाच्या विषयाला केंद्रस्थानी ठेवून शिवस्वराज्य चळवळ आणि समृद्ध मराठी चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत व्यवसाय, उद्योग आणि उद्योजकतेच्या माध्यमातून उल्लेखनीय काम करणाऱ्या उद्योजकांना एकत्र आणण्याबरोबरच त्यांच्या कार्याचा सन्मान करण्याचा या सोहळ्याचा उद्देश आहे.
या परिषदेत उद्योजकता, व्यवसायवृद्धी, उद्योग क्षेत्रातील संधी, नेटवर्किंग आणि मराठी उद्योजकांसमोरील विविध आव्हाने याबाबत विचारमंथन होण्याची अपेक्षा आहे. नव्याने व्यवसाय सुरू करणाऱ्या तसेच उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेल्या उद्योजकांसाठी हा कार्यक्रम मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरणार आहे.
पहिल्या १ हजार उद्योजकांनाच प्रवेश
कार्यक्रमाच्या नियोजनाच्या दृष्टीने सहभागी होणाऱ्या प्रत्येक उद्योजकाने गुगल फॉर्म भरणे आवश्यक असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. पहिल्या १ हजार उद्योजकांना प्रवेश देण्यात येणार असून त्यानंतर गुगल फॉर्म बंद करण्यात येईल. त्यामुळे इच्छुक उद्योजकांनी विलंब न करता नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
आपल्यासोबत अन्य उद्योजकांना या परिषदेत सहभागी करून घ्यायचे असल्यास त्यांचाही स्वतंत्रपणे गुगल फॉर्म भरून घ्यावा, असे आयोजकांनी सांगितले आहे. जे उद्योजक प्रथम फॉर्म भरतील, त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक उद्योजकांनी आयोजकांनी उपलब्ध करून दिलेल्या गुगल फॉर्मद्वारे नोंदणी करावी. परिषदेला प्रवेश मिळण्यासाठी गुगल फॉर्म भरणे आवश्यक असल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे.
या उपक्रमाचे संयोजक संजय यादवराव असून अनिष निंबकर हे कोकण विभागीय संयोजक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. मराठी उद्योजकतेच्या विकासासाठी आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेत कोकणासह महाराष्ट्रातील उद्योजकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













