दापोली शहरातील बौद्धवाडी येथे ४० वर्षीय व्यक्तीने घरातील बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (१८ ऑगस्ट) दुपारी साडेएकच्या सुमारास घडली.
विश्वजित विश्वनाथ कासारे (वय ४०, रा. बौद्धवाडी, दापोली) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वजित कासारे हे वारंवार आजारी असायचे. आजारपणाला कंटाळून त्यांनी घरात कोणी नसताना बेडरूममधील छताच्या लोखंडी बाराला कॉटनची ओढणी बांधून त्याद्वारे गळफास घेतल्याचे प्राथमिक माहितीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याबाबत प्रविण जनार्दन तांबे (वय ४८, व्यवसाय हॉटेल, रा. बौद्धवाडी, दापोली) यांनी पोलिसांना खबर दिली.
दापोली पोलीस ठाण्यात अमृ रजि. नं. ५९/२०२६, बीएनएसएस कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली असून, पुढील तपास वरिष्ठांच्या आदेशाने मपोहेकॉ/१३०४ ढोले यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना बिनतारी संदेशाद्वारे देण्यात आली असून, जाहीर अहवाल कार्यकारी दंडाधिकारी, दापोली यांच्याकडे पाठविण्याची कार्यवाही सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













