दापोली : मध्यरात्री मद्यधुंद अवस्थेत आरडाओरड, चौघांवर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा

banner 468x60

दापोली शहरातील केळस्कर नाक्याजवळ मध्यरात्रीच्या सुमारास मद्यसेवन करून सार्वजनिक ठिकाणी मोठमोठ्याने आरडाओरड करत गोंधळ घालणाऱ्या चौघांविरोधात दापोली पोलिसांनी कारवाई केली आहे. सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग केल्याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90

ही घटना १६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे १.३० वाजता दापोली केळस्कर नाक्याजवळ रस्त्याच्या बाजूला घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित चौघे जण मद्यसेवन केलेल्या अवस्थेत रस्त्याच्या बाजूला मोठमोठ्याने आरडाओरड करत होते. तसेच हातवारे करून सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांच्या या वर्तनामुळे सार्वजनिक शांततेचा भंग होत असल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली.

या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा भाऊसाहेब चौधरी (वय ३४) यांनी फिर्याद दिली. ते दापोली पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.

या प्रकरणात गुन्हा रजिस्टर क्रमांक १६१/२०२६ नोंदविण्यात आला असून, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८५(१), ८५(२) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ११० व ११७ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. गुन्हा १६ ऑगस्ट रोजी पहाटे ५.१४ वाजता दाखल करण्यात आला.

पोलिसांनी या प्रकरणात चार जणांना आरोपी केलं असून

  1. आदिनाथ मिलिंद पवार (वय २३), रा. जालगाव, सतारवाडी, ता. दापोली, जि. रत्नागिरी.
  2. शुभम भगवान मिसाळ (वय २५), रा. चंद्रनगर, मळेवाडी, ता. दापोली.
  3. कृष्णा अर्जुन पाटील (वय २४), रा. हर्णे, ख्रिश्चनवाडी, ता. दापोली.
  4. सनिल अर्जुन पाटील (वय २६), रा. हर्णे, ख्रिश्चनवाडी, ता. दापोली, जि. रत्नागिरी. गुन्हा दाखल केला आहे.

मध्यरात्री सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन करून गोंधळ घालणाऱ्या व्यक्तींविरोधात दापोली पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे सार्वजनिक ठिकाणी शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईचे चित्र स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास दापोली पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *