रत्नागिरी : टेरेसवरील शेवाळ्यावरून पाय घसरला, 58 वर्षीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

banner 468x60

रत्नागिरी शहरातील एका बंगल्याच्या टेरेसची साफसफाई करत असताना शेवाळ्यावरून पाय घसरून खाली पडल्याने ५८ वर्षीय कामगाराचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी, १५ ऑगस्ट रोजी घडली. संतोष बाळकृष्ण देसाई (वय ५८, रा. ओरी, ता. जि. रत्नागिरी) असे मृत कामगाराचे नाव आहे.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष देसाई हे रत्नागिरी शहरातील एका बंगल्याच्या टेरेसची साफसफाई करत होते. साफसफाईचे काम सुरू असताना टेरेसवर असलेल्या शेवाळ्यावरून अचानक त्यांचा पाय घसरला. त्यामुळे त्यांचा तोल जाऊन ते टेरेसवरून खाली जमिनीवर कोसळले.

या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटल, रत्नागिरी येथे नेण्यात आले. मात्र, १५ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १.४५ वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित केले.


या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *