लांजा : वेरळ घाटात दरड कोसळली, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक विस्कळीत

banner 468x60

लांजा तालुक्यातील वेरळ घाटात मुसळधार पावसामुळे मंगळवारी रात्री पुन्हा दरड कोसळल्याची घटना घडली. सततच्या पावसामुळे घाटातील माती खचून मोठी दरड रस्त्यावर आल्याने काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला.


यापूर्वीही गेल्या आठवड्यात याच घाटात दरड कोसळली होती. त्यामुळे वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे वाहनचालकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. सध्या मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक एकेरी मार्गाने सुरू असून, जेसीबीच्या सहाय्याने दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

दरड पूर्णपणे हटवल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. सततच्या पावसामुळे घाट परिसरात दरड कोसळण्याचा धोका कायम असल्याने वाहनचालकांनी काळजी घेण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *