Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

संगमेश्वर : वाघजाई मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या वृद्ध महिलेचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू; परिसरात शोककळा

banner 468x60

संगमेश्वर तालुक्यातील साडवली गावात अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून, वाघजाई मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या ७६ वर्षीय वृद्ध महिलेचा सप्तलिंगी नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला. अनिता अनंत वाचासिद्ध (वय ७६, रा. सह्याद्रीनगर, साडवली) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे साडवलीसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, हळहळ व्यक्त केली जात आहे.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, अनिता वाचासिद्ध या २७ जून रोजी सकाळच्या सुमारास साडवली येथील प्रसिद्ध वाघजाई मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. त्याचवेळी त्यांचा मुलगा आशुतोष अनंत वाचासिद्ध हा ग्रामपंचायतीच्या कामानिमित्त जवळील जाधववाडी परिसरात गेला होता. काम पूर्ण झाल्यानंतर वेळ असल्याने आई मंदिरातच असतील, या उद्देशाने तो त्यांना घेण्यासाठी मंदिरात पोहोचला. मात्र, मंदिर परिसरात बराच शोध घेतल्यानंतरही आई कुठेच दिसून न आल्याने त्याची चिंता वाढली.

यानंतर त्याने मंदिर परिसर आणि नदीकाठाचा भाग तपासण्यास सुरुवात केली. मंदिरासमोरील सप्तलिंगी नदीच्या काठी असलेल्या झाडाखाली त्याला आईच्या चपला, कमरेचा पट्टा तसेच गुडघ्याला वापरण्यात येणारा नी-कॅप पडलेला आढळला. या वस्तू पाहताच काहीतरी अनर्थ घडल्याची शंका आल्याने त्याने मोठ्याने आरडाओरडा करत परिसरातील नागरिकांना मदतीसाठी बोलावले. त्यानंतर ग्रामस्थ, नातेवाईक आणि उपस्थित नागरिकांनी मिळून नदीपात्रात शोधमोहीम सुरू केली.

शोध सुरू असताना सप्तलिंगी नदीतील ‘सप्तलिंगी देवाचा कोंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खोल पाण्याच्या ठिकाणी अनिता वाचासिद्ध या पाण्यावर तरंगताना आढळून आल्या. त्यांना तातडीने पाण्याबाहेर काढून उपचारासाठी देवरुख येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच देवरुख पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या प्रकरणाची नोंद देवरुख पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये करण्यात आली असून, घटनेचा पुढील तपास आणि कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.

दरम्यान, अनिता वाचासिद्ध या धार्मिक स्वभावाच्या असून त्या नियमितपणे मंदिरात दर्शनासाठी जात असत, अशी माहिती स्थानिकांकडून मिळाली. त्यांच्या अकस्मात निधनामुळे वाचासिद्ध कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, साडवली परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *