दापोली : सिलेंडरने भरलेला पिकअप पलटी; सर्व सिलेंडर रस्त्यावर,सुदैवाने जीवितहानी टळली

banner 468x60

दापोली : दापोली-मंडणगड मार्गावरील करजांणी येथे आज, रविवार(२८ जून) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सिलेंडरने भरलेल्या पिकअप वाहनाचा अपघात झाला. वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने पिकअप अनियंत्रित होऊन रस्त्यावर पलटी झाला.

या अपघातात वाहनामध्ये भरलेले सर्व गॅस सिलेंडर रस्त्यावर विखुरले गेले. त्यामुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. सिलेंडर रस्त्यावर पडल्याने वाहतुकीलाही काही काळ अडथळा निर्माण झाला.

मात्र, सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. चालकासह अन्य कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. रस्त्यावर विखुरलेले सिलेंडर बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी त्यांनी सहकार्य केले. या अपघातात मोठी दुर्घटना टळल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *