मंडणगडमध्ये सार्वजनिक वाहतुकीस अडथळा, वाहनचालकाविरोधात गुन्हा

banner 468x60

मंडणगड तालुक्यातील मंडणगड बाजारपेठेत सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका वाहनचालकाविरोधात मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (१४ जून २०२६) सायंकाळी सुमारे ६.२० वाजण्याच्या सुमारास मंडणगड बाजारपेठेतील स्वागत हॉटेलसमोरील मंडणगड-मुंबई मार्गावर आरोपी अली अहमद अब्दुल रहिमान लांबे (वय २२, रा. शिपोळे बंदर, ता. मंडणगड) याने त्याच्या ताब्यातील ईको गाडी (क्र. एमएच-०८ बीई-८०७७) सार्वजनिक रस्त्यावर धोकादायक स्थितीत उभी करून ठेवली होती.

या वाहनामुळे ये-जा करणाऱ्या वाहनांना तसेच पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी पोलीस कर्मचारी वैशाली प्रविण सुकाळे यांनी फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६५/२०२६ नोंद करण्यात आला असून आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ अंतर्गत कलम २८५ तसेच सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याबाबत संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंडणगड पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *