Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

खेड : अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला 20 वर्षे सक्तमजुरी खेड न्यायालयाचा निकाल

banner 468x60

खेड तालुक्यातील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीला कठोर शिक्षा सुनावत महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. आरोपी रोहन शंकर पालकर (वय २३, रा. खारी-सेसरी, ता. खेड) याला न्यायालयाने दोषी ठरवत २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. जिल्हा न्यायाधीश पी. एन. चांगुडे यांनी हा निकाल दिला. याशिवाय आरोपीला विविध कलमान्वये दंडाची शिक्षाही ठोठावण्यात आली असून, दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे.

banner 728x90

ही घटना कोविड काळातील असून, त्या वेळी पीडित मुलगी शालेय शिक्षण घेत होती. ऑनलाइन वर्गासाठी ती आपल्या मैत्रिणीच्या घरी गेली असताना आरोपीने घरात कोणी नसल्याचा फायदा घेत तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर आरोपीने पीडित मुलीला जीवे मारण्याची धमकी देत हा प्रकार कुणालाही सांगू नये, अशी दमदाटी केली होती. त्यामुळे घाबरलेल्या अवस्थेत पीडित मुलगी काही काळ शांत राहिली.

मात्र, कालांतराने तिच्या वर्तनात बदल दिसू लागल्याने कुटुंबीयांना संशय आला. त्यांनी मुलीला विश्वासात घेत चौकशी केली असता संपूर्ण प्रकार समोर आला. त्यानंतर कुटुंबीयांनी खेड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवत तपास सुरू केला.

या प्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सोनाली झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. तपासादरम्यान पीडितेचा जबाब, वैद्यकीय तपासणी, घटनास्थळ पंचनामा तसेच डीएनए अहवाल यासारखे महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले. या पुराव्यांच्या आधारे आरोपीविरुद्ध भक्कम दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले.

खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकार पक्षाकडून एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. पीडित मुलीची साक्ष, वैद्यकीय अहवाल आणि डीएनए अहवाल हे या प्रकरणातील अत्यंत महत्त्वाचे पुरावे ठरले. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील मृणाल जाडकर यांनी प्रभावी युक्तिवाद करत आरोपीविरुद्धचे पुरावे न्यायालयासमोर सादर केले.

सर्व पुरावे, साक्षी आणि युक्तिवादांचा सखोल विचार करून न्यायालयाने आरोपीविरुद्धचा गुन्हा निर्विवादपणे सिद्ध झाल्याचे नमूद केले. न्यायालयाने भारतीय दंड संहितेतील विविध कलमांसह पोक्सो कायदा अंतर्गत आरोपीला दोषी ठरवत २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. या निकालामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत असून, अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये कठोर शिक्षा होणार असल्याचा स्पष्ट संदेश समाजात गेला आहे. तसेच या प्रकरणात तपास करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि सरकारी पक्षाच्या वकिलांच्या कामगिरीचेही सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *