दापोली : वरातीतील वाद्याच्या आवाजावरून वाद, मारहाणीची घटना, गुन्हा दाखल

banner 468x60

दापोली तालुक्यातील गिम्हवणे येथील गोसावीवाडी परिसरात वरातीतील वाद्याचा आवाज कमी करण्यास सांगितल्यावरून वाद होऊन मारहाणीची घटना घडली. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


banner 728x90

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवार दिनांक २९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास भींजाळी, गोसावीवाडी, गिम्हवणे (ता. दापोली, जि. रत्नागिरी) येथे घडली. याबाबत प्रभाकर दत्त मंडपे (वय ५२, रा. भींजाळी, गोसावीवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांच्या वाडीतून वरात जात असताना त्यांनी वाद्याचा आवाज कमी करण्यास सांगितले. त्यावरून आरोपी धिरण विकास मंडपे आणि भास्कर विष्णु मंडपे (दोघेही रा. गोसावीवाडी, ता. दापोली) यांनी फिर्यादींशी वाद घालत त्यांच्या छातीवर हाताने जोरदार मारहाण केली. या झटापटीत फिर्यादी बाजूला असलेल्या खड्ड्यात पडून जखमी झाले.

दरम्यान, वाद सोडवण्यासाठी गेलेल्या साक्षीदारांनाही आरोपींनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात गु.र.नं. ७८/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम १२५(अ) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *