Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

रत्नागिरी : मालवणच्या समुद्रात रत्नागिरीतील एलईडी नौकेवर कारवाई

banner 468x60

सिंधुदुर्ग मत्स्यव्यवसाय विभागाने देवबाग सागरी क्षेत्रात गस्तीदरम्यान अवैध मासेमारीविरोधात मोठी कारवाई करत रत्नागिरी जिल्ह्यातील ‘भुवनेश्वरी’ या एलईडी मासेमारी नौकेला जप्त केले आहे. विनापरवाना आणि बंदी असलेल्या एलईडी प्रकाशझोताचा वापर करून मासेमारी केल्याचे स्पष्ट झाल्याने ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, ३० मार्च रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास मालवण-देवबाग समुद्र परिसरात नियमित गस्त सुरू असताना मत्स्य विभागाच्या पथकाला संशयास्पद हालचाल दिसून आली. तपासणी केली असता ‘भुवनेश्वरी’ ही नौका सुमारे ११ ते १२ सागरी मैल अंतरावर एलईडी लाईट्सचा वापर करून मासेमारी करताना आढळली. महाराष्ट्र सागरी हद्दीत अशा प्रकारची मासेमारी बंदी असूनही संबंधित नौका नियमांचे उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास आले.

ही नौका रत्नागिरी जिल्ह्यातील शिरगाव येथील महेश मनोहर आयरे यांच्या मालकीची असून, नौकेवर तांडेलसह दोन खलाशी उपस्थित होते. कारवाईदरम्यान नौकेवरील मासेमारी साहित्याची तपासणी करण्यात आली आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली असता परवाना नसल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर मत्स्य विभागाने तात्काळ कारवाई करत नौका जप्त केली आणि तिला सर्जेकोट-मालवण बंदरात आणून ठेवण्यात आले. पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, याबाबतचा सविस्तर अहवाल सिंधुदुर्गचे मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त सागर कुवेसकर यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.

या कारवाईत सागरी सुरक्षा पर्यवेक्षक मायबा, परब, जाधव, जुवाटकर आणि सावजी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

दरम्यान, राज्याचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसायमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार अवैध मासेमारीविरोधात कठोर मोहीम राबवली जात आहे. एलईडी लाईट्सचा वापर करून होणारी मासेमारी ही समुद्री जैवविविधतेसाठी घातक ठरत असल्याने अशा प्रकारांवर कठोर कारवाई केली जात असल्याचे मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त सागर कुवेसकर यांनी स्पष्ट केले.

यापुढेही सागरी हद्दीत गस्त वाढवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नौकांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *