रत्नागिरी : ई-गव्हर्नन्समध्ये उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचा राज्यस्तरीय सन्मान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नितीन बगाटे यांचा गौरव

banner 468x60

राज्य शासनाच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचा विशेष गौरव करण्यात आला. सुमारे दीडशे दिवस चाललेल्या या कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला होता.

banner 728x90


या मूल्यमापन प्रक्रियेत रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयाने २०० पैकी १४४.२५ गुण मिळवत राज्यात पाचवे स्थान मिळविले. या उल्लेखनीय यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बगाटे यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.


ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून पोलीस प्रशासन अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी बगाटे यांनी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. ‘मिशन जीवन’द्वारे जनजागृती व आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा बळकट करण्यात आली, तर ‘रेड्स ॲप’मुळे कारवाई प्रक्रियेत वेग आणि अचूकता आली. ‘मिशन गती’च्या माध्यमातून प्रलंबित कामांचा निपटारा जलद करण्यात आला, तसेच ‘रत्नसेतू चॅटबॉट’च्या साहाय्याने नागरिकांना ऑनलाइन सेवा व माहिती सहज उपलब्ध करून देण्यात आली.


या सर्व उपक्रमांमुळे पोलीस यंत्रणा अधिक तंत्रस्नेही बनली असून नागरिकांशी संवाद अधिक सुलभ झाला आहे. प्रशासनातील कार्यपद्धतीत पारदर्शकता वाढून सेवा वितरण अधिक प्रभावी झाले आहे.


राज्य शासनाने या उपक्रमांची दखल घेत बगाटे यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी पोलीस दलाने ई-गव्हर्नन्स क्षेत्रात केलेली प्रगती ही इतर जिल्ह्यांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *