कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका दाभोळ शहरालाही बसला असून, मंगळवार मध्यरात्रीच्या सुमारास लोकमान्य टिळक विद्यालया बाजुला असलेल्या विहिरीच्या येथील रस्त्यावर एक भलंमोठं आंब्याचं झाड कोसळले. झाड थेट रस्त्यावर आल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सुदैवाने ही घटना मध्यरात्री घडल्यामुळे त्या वेळी रस्त्यावर कोणतीही वर्दळ नव्हती. त्यामुळे कोणतीही जीवितहानी अथवा दुखापतीची घटना घडली नाही. मात्र झाड कोसळताना विद्युत वाहिन्यांनाही मोठा फटका बसल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.
घटनेची माहिती तत्काळ संबंधित वीज वितरण विभाग आणि स्थानिक प्रशासनाला देण्यात आली. त्यानंतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून झाड हटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. झाड बाजूला केल्यानंतरच रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.
दाभोळ परिसरात सध्या मुसळधार पाऊस कायम असल्याने आणखी झाडे कोसळण्याची तसेच इतर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, मोठ्या झाडांखाली वाहने उभी करू नयेत आणि वीजवाहिन्यांपासून सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
मुसळधार पावसामुळे दाभोळसह परिसरातील जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले असून, प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक ती उपाययोजना करत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*











