Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी, सहा तालुक्यांनी ओलांडली शंभरी

xr:d:DAFM2UovjpE:2,j:35908474512,t:22092109

banner 468x60

मान्सूनने रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा एकदा दमदार मुसंडी मारली असून मंगळवारी (३० जून) जिल्हाभर जोरदार पावसाची नोंद झाली. दिवसभरात जिल्ह्यात एकूण ९५०.३८ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली असून सरासरी पाऊस १०५.५९ मिलीमीटर इतका राहिला.

banner 728x90


जिल्ह्यातील नऊही तालुक्यांमध्ये पावसाने समाधानकारक हजेरी लावली. त्यापैकी रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक १४३.७७ मिलीमीटर पाऊस झाला. गुहागरमध्ये १२७.६० मिलीमीटर, मंडणगडमध्ये १२०.२५ मिलीमीटर, संगमेश्वरमध्ये ११०.०० मिलीमीटर, राजापूरमध्ये १०६.२५ मिलीमीटर आणि दापोलीमध्ये १०५.०० मिलीमीटर पाऊस पडत या तालुक्यांनी शंभरीचा टप्पा पार केला.


चिपळूणमध्ये ८७.७७ मिलीमीटर आणि लांजामध्ये ८४.६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. खेड तालुक्यात तुलनेने सर्वात कमी ६५.१४ मिलीमीटर पाऊस झाला असला, तरी तेथेदेखील पावसाची चांगली नोंद झाली आहे.


जिल्हाभर झालेल्या या पावसामुळे खरीप हंगामाला बळ मिळाले असून भातलावणीसह शेतीची कामे वेगाने सुरू झाली आहेत. तसेच नद्या, ओढे आणि धरणांच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *