दाभोळ : समुद्रकिनारी अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाले, तरुणावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

banner 468x60

दाभोळमध्ये एक धक्कदायक घटना समोर आली आहे. दापोली तालुक्यातील दाभोळ येथे १३ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय अनुप चव्हाण (मूळ रा. भोजगा तांडा, नलदुर्ग, ता. जि. धाराशिव; सध्या राहणार भिवबंदर पंचनदी तर्फे वणोशी, ता. दापोली याच्याविरुद्ध दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. १२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ७४, ३५१(२) तसेच Protection of Children from Sexual Offences Act (पॉक्सो) कायदा २०१२ च्या कलम ८ व १० अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

banner 728x90 banner 728x90

शाळेतून बाहेर पडल्यानंतरचा प्रकार
दाभोळ पोलीस ठाण्यात फिर्यादी महिलेच्या तक्रारीनुसार, त्यांची १३ वर्षाची मुलगी दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजता शाळेसाठी घरातून निघाली होती. ती दाभोळ येथे शिक्षण घेत असून शाळा दुपारी १२.३० वाजता सुटते. मात्र दुपारी २.१५ वाजेपर्यंत मुलगी घरी न परतल्याने पालकांनी तिचा शोध सुरू केला. नातेवाईक, मैत्रिणी आणि परिसरात चौकशी केली असता दुपारी सुमारे ३.१५ वाजता मुलगी आरोपीसोबत आढळून आली.

धमकी देऊन समुद्रकिनारी नेल्याचा आरोप

मुलीकडून मिळालेल्या माहितीनुसार, शाळा सुटल्यानंतर दुपारी सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास आरोपीने तिला उचलून नेण्याची धमकी दिली. त्यानंतर तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून दाभोळ समुद्रकिनारी नेण्यात आले. तेथे तिच्यासोबत अश्लील कृत्य करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. ही घटना दुपारी १.३० ते ३.१५ या वेळेत घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

पॉक्सो अंतर्गत शिक्षा

भारतीय न्याय संहिता कलम ७४ – १ वर्ष ते ५ वर्षांपर्यंत कारावास व दंड
कलम ३५१(२) – २ वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही
पॉक्सो कायदा कलम ८ व १० – ७ वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद

पोलिसांचा तपास सुरू

दाभोळ सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल गोरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. संबंधित मुलीचा जबाब नोंदविणे, वैद्यकीय तपासणी तसेच घटनास्थळ पंचनामा करण्याची प्रक्रिया सध्या पोलिसांकडून सुरु आहे.

पालकांना दाभोळ पोलिसांचे आवाहन
या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पालकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. अल्पवयीन मुला-मुलींवर सतत लक्ष ठेवावे, शाळेतून ये-जा करताना त्यांच्याशी नियमित संवाद साधावा, तसेच अनोळखी व्यक्तींशी संपर्क, दुचाकीवर बसणे किंवा संशयास्पद हालचाली याबाबत मुलांना योग्य मार्गदर्शन करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *