दाभोळ : घर फोडून 7 लाखांचे दागिने चोरीला, साडेसात लाखांच्या दागिन्यांवर चोरट्याचा डल्ला

banner 468x60

दाभोळ सागरी पोलीस ठाणे हद्दीत पंचनदी कुणबीवाडी येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी करून तब्बल ₹7 लाख 5 हजार किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गुन्हा रजि. नं. 11/2026 दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 305 व 331(3) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

banner 728x90 banner 728x90

घटना कशी घडली?

फिर्यादी मानशी महेंद्र नाचरे (वय 37, रा. पंचनदी कुणबीवाडी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 22 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 7 या वेळेत ही चोरी झाली. कुटुंबीय लग्न समारंभासाठी घराबाहेर गेले असताना अज्ञात व्यक्तीने घराचा मागील दरवाजा जोराने ढकलून आत प्रवेश केला. त्यानंतर लोखंडी कपाट फोडून लॉकर उघडण्यात आला व त्यातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेण्यात आली.
सायंकाळी घरी परतल्यानंतर कपाटातील लॉकर फोडलेले आढळले. लॉकरमधील स्टीलच्या भांड्यात व प्लास्टिकच्या डब्यात ठेवलेले दागिने व रोख रक्कम गायब असल्याचे निदर्शनास आले.

चोरीस गेलेल्या मालमत्तेचा तपशील

1) 1,10,000/- रु एक 11 ग्रॅम वजणाचा एकेरी सर असलेला व त्यात काळे मणी असलेला एक वाटी असलेला सोन्याचा मंगळसुत्र जुना वापरते. कि.सु.

2) 1,10,000/-रु एक 11 ग्रॅम वजणाचा एकेरी सर असलेला व त्यात काळे मणी व दोन वाटी असलेला सोन्याचा मंगळसुत्र जुना वापरते कि.सु.

3) 50,000/-रु कानातील सोन्याचे 5 ग्रॅम वजणाचो कुडी जोड जुना वापरते. कि.सु.

4) 40,000/-रु कानातील कानपट्टी चैन सोन्याची 4 ग्रॅम वजणाची जुना वापरते. कि.सु.

5) 40,000/- रु एक लेडीज अंगठी सोन्याची 4 ग्रॅम वजणाची जुना वापरते.कि.सु.

6) 20,000/-रु एक लेडीज नथ सोन्याची व त्यात मोथी असलेले २ ग्रॅम वजणाची जुना वापरते. कि.सु

7) 40,000/- रु एक जेन्टस अंगठी सोन्याची 4 ग्रॅम वजणाची जुना वापरते. कि.सु.

8) 60,000/- रु एक जेन्टस चैन सोन्याची 6 ग्रॅम वजणाची जुना वापरते.

कि.सु. 9) 1,50,000/-रु एक जेन्टस चैन सोन्याची 15 ग्रॅम वजणाची लॉकेट असलेली जुना वापरते. कि.सु

10) 80,000/-रु एक जेन्टस अंगठी सोन्याची 8 ग्रॅम वजणाची जुना वापरते. कि.सु.

11) 5000/- रु 500 रु किंमतीच्या 10 नोटा रोख रक्कम कि.सु.

एकूण 7,05,000/- रु

घटनेची माहिती मिळताच दाभोळ पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, संशयितांची चौकशी तसेच तांत्रिक तपासाद्वारे आरोपीचा शोध घेतला जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना बिनतारी संदेशाद्वारे कळविण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी नागरिकांना घर बंद ठेवताना सुरक्षेची योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक अमोल गोरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *