दाभोळमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दाभोळमधील एका महिलेला अश्लील शिवीगाळ, अपमानास्पद भाषेत शिवीगाळ आणि रस्ता अडवून अश्लील बोलण्याचा प्रकार घडला आहे.
दाभोळ येथील खडपकरवाडी परिसरात एका ४९ वर्षीय महिलेला रस्ता अडवून अश्लील आणि अपमानास्पद भाषेत शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला असून, याप्रकरणी दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत दाभोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या दि. १४ फेब्रुवारी २०२६ शनिवार रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घरातून दुकानाकडे जात असताना दाभोळ खडपकरवाडी रोडवर संशयित आरोपी कमालुद्दीन हुसेन मिया बामणे वय 58 (रा. दाभोळ बामणे मोहल्ला) याने त्यांचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला.
या वेळी आरोपीने फिर्यादीला उद्देशून अश्लील व लज्जास्पद शब्द वापरून अपमानास्पद वक्तव्य केल्याने फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न झाली तसेच मानसिक त्रास झाला. या प्रकारामुळे फिर्यादीला आरोपीकडून धोका वाटू लागल्याने त्यांनी दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
फिर्यादी यांनी म्हटलं की “याआधी देखील असा प्रकार घडला असून आम्ही तो विषय जमातीत नेला होता मात्र
कमालुद्दीन हुसेन मिया बामणेने पुन्हा तश्याच पद्धतीचा त्रास दिला आहे. मी एक विधवा महिला असून गेल्या अनेक महिन्यांपासून समज देऊन सुद्धा असा त्रास झाला आहे. मागे आम्ही पोलिसांकडे जाऊन कमालुद्दीन हुसेन मिया बामणेला समज देखील दिली होती.”
फिर्यादीच्या तक्रारीवरून अस म्हटलं आहे की “घरातून दुकानाकड़े जात असताना फिर्यादीच्या चुलत नणंदेचा पती संशयित आरोपी कमालुद्दीन हुसेन मिया बामणे याने फिर्यादीचा रस्ता आडवण्याचा प्रयत्न केला व अश्लिल भाषेत बोलला ” तूला झ#### करायला कोण मिळत नाही, म्हणुन तू माझी वाट बघत असतेस, मी दिसत नाही म्हणुन माझी रस्त्यावर येवून वाट बघत असतेस” अश्या अश्लिल भाषेत शिवीगाळ केली कमालुद्दीन हुसेन मिया बामणे याच्यापासून धोका वाटू लागल्याने फिर्यादी यांनी कमालुद्दीन हुसेन मिया बामणे विरुध्द कायदेशीर फिर्यादी दिली आहे.
दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. १०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या आदेशानुसार मपोहेकॉ/६२७ गुजर करीत आहेत.
दरम्यान, सदर गुन्ह्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना बिनतारी संदेशाद्वारे देण्यात आली असून, प्रथम खबर प्रथमवर्ग न्यायालय, दापोली येथे दाखल करण्यात आली आहे.
या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून, महिलांच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















